Posts

अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण

Image
  अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण वाचतोय.  वाक्यावाक्यागणिक शहाणीवेच्या एका प्रगाढ अरण्यात शिरल्याची चाहूल लागलीय ; पुढल्या थराराची अवचित ओळख पटल्यासारखी. एकेक वाक्य म्हणजे जणू एकेक झाड. भौतिकाच्या रसरशीत जीवनद्रव्यातून फुललेल्या सार्थ मौलिकतेसारखं. हा प्रवास जितका गूढतरल असतो तितकाच रोमांचक... या अरण्याशी जितकं सख्य वाढत जाईल तसा या चित्रलिपीचा उलगडा होतोय... शब्दांच्या झुडपावेलींमधे,गचपणांमध्ये, फांद्यांच्या बेचक्यांमध्ये दबा धरून बसलेली अर्थाची पाखरं नजरेला गवसू लागतात हळूहळू. लहानसहान साक्षात्काराच्या कवडशांनी अवचित आपलं असणं उजळून निघतं. या अरण्याच्या स्वयंभू चित्रलिपीला भिडायचं तर कागदी निमंत्रण नाकारायला हवीत; ऐहिकाच्या सोहळ्यांनी अंगाला चिकटलेली पुटं खरवडायला हवीत हे पुरतं लक्षात येत जातं. ...तितक्यात समोरून वास्तवाचा विस्तव धरून काटेरान तुडवत येणारे डहाके सर दिसतायत... जवळ येऊन खांद्यावर हलकेच थोपटत आपल्या त्या खोल खर्जातल्या आवाजात सांगू लागतात. "झाड तोडायचं, कापायचं,लगदा करायचा  कागद बनवायचा, मग त्यावर लिहायचं ते छापायचं, मग वाचायचं. एवढा खटाटोप कशासाठी ? सरळ झाडच वाचावं.
Image
काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ... -श्रीराम सीताराम मोहिते  अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणाच्या एका प्रदीर्घ कालपटावरचे लोकोत्तर लोकनायक होते.एरवीच्या राजकारणात दुर्मिळ अशी अभिजात शालीनता,मूळच्या प्रवाही आणि काव्यात्म भाषाशैलीला धारदार वाचन-व्यासंगाची जोड देऊन घडवलेलं अमोघ वक्तृत्व,राजकारणाच्या वादळी धुमश्चक्रीतसुद्धा आपल्या व्यक्तित्वात अलवारपणे जपलेलं विलक्षण तरल कवित्व, आणि अंतर्बाह्य आचरणाला दिलेलं अपूर्व नैतिक अधिष्ठान यामुळे अटलजी देशाच्या राजकीय-सामाजिक इतिहासातले एक अव्दितीय व्यक्तिमत्व ठरते. लाघवीपण आणि कणखरपणा यांची एक विलक्षण बेमालूम गुंफण हा त्यांच्या व्यक्तित्वाचा एक ठळक विशेष होता. एका बाजूला गोध्रा हत्याकांडानंतर गुजरात सरकारला सडेतोडपणे राजधर्माची आठवण करून देणारे, कारगील युद्धाची मोहीम आपल्या विजिगीषू वृत्तीने विजयाप्रत नेणारे, आणि पोखरण अणूचाचणीमधून आपल्यातल्या धाडसी नेतृत्वाचे गुण दाखवणारे अटलजी आणि दुसऱ्या बाजूला लहान मुलांशी निरागस बांध जपणारे, विरोधी पक्षातल्या लोकांवरही अकृत्रिम असे प्रेम करणारे, आणि या सगळ्यात आपल्या आतल्या तरल कवित्वाची त

स्वत्वाच्या शोधात 'थिसियसचे जहाज'

Image
स्वत्वाच्या शोधात 'थिसियसचे जहाज'  -श्रीराम मोहिते कुठलाही चांगला चित्रपट मनोरंजन तर करत असतोच पण त्यापलीकडे जाऊन जगण्याबद्दलची आपली समज वाढवतो; जगण्याकडे बघण्याची आपली एकरेषीय दृष्टी रुंदावण्यास मदत करतो.मुख्य प्रवाहातील कचकडी चित्रपट वास्तवाचे एक वरवरचे आणि बरेचसे पलायनवादी चित्रण करताना दिसतात त्याला छेद देऊन वास्तवाच्या अनेकस्तरीय गुंतागुंतीचे भान देणारे अनेक चित्रपट आज निर्माण होत आहेत. आपण भारतीय सिनेमा असं म्हणतो तेंव्हा प्रामुख्याने आपल्या नजरेसमोर जे लोकप्रिय सिनेमाचं चित्र उभं राहतं त्याहून वेगळ्या आशय विषयांचे दर्शन घडवणारे असे प्रयत्न अनेक अर्थाने महत्वाचे ठरतात.चित्रपट कलेच्या वाढीसाटी हे चित्र निश्चितच आश्वासक असते.हे सर्वार्थाने नवे चित्रपट मानवी जगण्याच्या अनेक छुप्या अंतर्विरोधांना आपल्यासमोर मांडतात,त्यातल्या अनेकविध पेचांना समजून घेण्याची आपली क्षमता वाढवतात.               'शिप ऑफ थिसियस' हा आनंद गांधी दिग्दर्शित चित्रपट मानवी अस्तित्वविषयक काही मूलभूत प्रश्नांना स्पर्श करतो. थिसियसचे जहाज हे एक प्राचीन मिथक आहे. इ.स.पहिल्या शत
Image
इरफान खान, निदा फाजली आणि अशाश्वतीचे सार्थपण  -श्रीराम मोहिते कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंजणारा प्रसिद्ध अभिनेता इरफान खानने लिहिलेलं एक पत्र सध्या चर्चेत आहे. हाय-ग्रेड न्युरोएण्डोक्राइन नावाचा हा दुर्मिळ कॅन्सर प्रकार त्याच्या आयुष्यात एक वादळ घेऊन आला. मात्र जीवनमरणाच्या एका अतर्क्य शक्यतांशी होणारी झुंज त्याला आयुष्यातलं मोलाचं काहीतरी देऊन गेल्याचं विलक्षण अस्वस्थ करणारं पण हृद्य मनोगत त्यानं या पत्रात व्यक्त केलंय. आयुष्य नावाच्या एका वेगवान प्रवासात अचानक कुणीतरी सांगावं की आता तुमची उतरायची वेळ झालीय. तुमचं स्टेशन आलंय. अजून आपल्याला खूप स्टेशनं घ्यायचीयेत या भ्रमात आपण निर्धास्त वाहत जाताना अचानक कसलीही सूचना न मिळता आपलं अखेरचं स्टेशनं अचानक येऊन उभं ठाकण्याचा हा क्षण अतिशय हादरवून टाकणारा असतो. पण त्याचवेळी; हीच 'अशाश्वततेतली शाश्वती' आपल्या प्रवासाचा नवा अर्थ लावायला कशी मदत करते याच हळवं हृद्गत या पत्रातून व्यक्त होतं. मृत्यूच्या इतक्या निकटच्या दर्शनानं आपल्याला अंतर्बाह्य बदलून टाकल्याचं त्यानं लिहिलंय. या आजाराच्या निमित्ताने वेदनेचा, दु